महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन पंच कार्यशाळा
दिवस १} बुधवार ६ मे २०२०
उदघाटन-सुत्रसंचालन -श्री योगेश यादव.
स्वागत/प्रस्तावना पंचसमितीचे सचिव श्री दत्ता झिंजुर्डे हे करतील.
त्यानंतर पंचसमितीचे मान.अध्यक्ष श्री रमेश हरयाण. हे ऑनलाइन पंच कार्यशाळेची संकल्पना सांगून कार्यशाळा शिबीरार्थींना प्रमुख पाहुण्यांची ओळख करून प्रमुख पाहुण्यांना सेमिनार उदघाटनाची विनंती करतील.
समारंभाचे प्रमुख अतिथी, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे,मान. सरकार्यवाह अॅड. श्री आस्वाद पाटील. कार्यशाळा कार्यक्रमाचे उदघाटन करतील व त्यांचे मनोगत व्यक्त करतील.

त्यानंतर पंचसमितीचे सचिव श्री दत्ता झिंजुर्डे हे श्री योगेश यादव यांना कार्यशाळेचे स्वरूप सांगण्याविषयी विनंती करतील. श्री योगेश यादव हे पंचसमिती अध्यक्ष श्री हरयाण, सचिव, श्री झिंजुर्ड यांचेबाबत पंचांना सविस्तर माहिती देऊन सर्व पंचांशी सवांद साधतील …..
आॅनलाईन पंच कार्यशाळा कार्यक्रमांत सहभागी होणाय्रा पंचसदस्यांनी खालील नमुद लिंक वर क्लिक करावे. मिटींग कोड व पासवर्ड नमुद करावा.
आपण योग्य युनिफॉर्म परिधान करून आपली प्रतिमा योग्य प्रकारे दिसेल अशा प्रकारे आपला मोबाईल/टॅब/लॅपटॉप सेट करावा. पंच कार्यशाळा सुत्रसंचालन राष्ट्रीय कबड्डी पंच श्री योगेश यादव हे पुणे येथून करीत आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी त्यांच्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे.
MSKA Refree Bord and PDKA Refree is inviting you to a scheduled Zoom meeting.

Topic: Maharashtra kabbadi Association Refree Workshop

Time:–7:30pm to 8:45pm

loading