महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन व चिपळूण तालुका कबड्डी असोसिएशन यांच्या सौजन्याने ६७वी वरिष्ठ गट पुरुष महिला राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा दि. १९.१२.२०१९ ते २२.१२.२०१९ या कालावधीमध्ये पवन तलाव मैदान, इंदिरा गांधी स्टेडियम शेजारी, चिपळूण, जिल्हा रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आली आहे.

सदर स्पर्धेत सहभागी होणारा आपला संघ निवडीसाठी आपण जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा आयोजित करणे आवश्यक आहे. जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेचा कालावधी, ठिकाण आदी तपशील राज्य संघटनेला लवकरात लवकर कळवावा म्हणजे आपल्या स्पर्धेला राज्य संघानेच्या वतीने निरीक्षक पाठवणे सोयीचे होईल. ज्या जिल्हा संघटनांची जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा झाली असेल अशा जिल्हा संघटनांनी स्पर्धेचा अहवाल राज्य संघटनेला सादर करावा, हि विनंती

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच पत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा