६३ वी वरिष्ठ गट राष्ट्रीय स्पर्धा विजेता संघ

कबड्डी दिन २०१९ श्री पांडुरंग पार्टे यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

चालू घडामोडी :

अनधिकृत स्पर्धेची माहिती देणेबाबत

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनची किंवा जिल्हा संघटनेची मान्यता न घेता अनेक जिल्ह्यात सध्या अनधिकृत स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत. तरी आपण आपल्या जिल्ह्यात होणाऱ्या अनधिकृत स्पर्धांची माहिती राज्य असोसिएशनला कळविणे क्रमपात्र आहे. स्पर्धा आयोजकाचे नाव, त्यात सहभागी खेळाडू, संघ, पंच, अधिकारी याबाबत अहवाल व फोटो तातडीने राज्य संघटनेला कळवावा म्हणजे त्यासंदर्भात कारवाई करणे सुलभ होईल. […]

जिल्हा संघटना करिता महत्त्वाची सूचना – जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेबाबत

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन व चिपळूण तालुका कबड्डी असोसिएशन यांच्या सौजन्याने ६७वी वरिष्ठ गट पुरुष महिला राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा दि. १९.१२.२०१९ ते २२.१२.२०१९ या कालावधीमध्ये पवन तलाव मैदान, इंदिरा गांधी स्टेडियम शेजारी, चिपळूण, जिल्हा रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आली आहे. सदर स्पर्धेत सहभागी होणारा आपला संघ निवडीसाठी […]

महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या तयारी करीता पहिली सभा संपन्न.

महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या तयारी करीता पहिली सभा मंगळवार दि. १२/११/२०१९ रोजी मा.श्री.रमेशभाई कदम, श्री.सचिनभाई कदम, श्री.बाबूशेठ तांबे, श्री.प्रतापराव शिंदे, श्री.रविंद्र देसाई व श्री.विलास गुजर यांच्या उपस्थितीत चिपळूण येथे संपन्न झाली.सभेस चिपळूण तालुक्यातील कबड्डी व क्रीड क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

६७ वी वरिष्ठ गट पुरुष महिला राज्य अजिंक्यपद निवड चाचणी २०१९

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन व चिपळूण तालुका कबड्डी असोसिएशन यांच्या सौजन्याने ६७वी वरिष्ठ गट पुरुष महिला राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा दि. १९.१२.२०१९ ते २२.१२.२०१९ या कालावधीमध्ये पवन तलाव मैदान, इंदिरा गांधी स्टेडियम शेजारी, चिपळूण, जिल्हा रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आली आहे. ६७वी वरिष्ठ गट पुरुष महिला राज्य अजिंक्यपद […]

ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन कार्यकारणी पंच वार्षिक निवडणूक २०१९-२०२४ वर्षाकरीत रविवार दिनांक १० नोव्हेंबर २०१९ रोजी जाहीर.

ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन कार्यकारणी पंच वार्षिक निवडणूक २०१९-२०२४ वर्षाकरीत रविवार दिनांक १० नोव्हेंबर २०१९ रोजी जाहीर करण्यात आली आहे. निवडणूक कोळी समाज हॉल, जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या शेजारी, सिडको, ठाणे (प.) येथे सकाळी ९.०० ते दुपारी ३.०० वाजे पर्यंत संपन्न होणार आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी अससोसिएशन तर्फे श्री. विश्वास मोरे यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती […]

महाराष्ट्राचे ८ खेळाडू भारतीय संघाच्या निवड शिबिरासाठी सज्ज

नेपाळ येथे होणाऱ्या दक्षिण आशियाई स्पर्धेसाठी भारतीय कबड्डी पुरुष व महिला संघ पाठवण्यात येणार आहे. यास्पर्धेसाठी भारतीय संघाच्या निवड शिबिरासाठी महाराष्ट्रातील ५ पुरुष व ३ महिला खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. रोहटक, हरियाना येथे ५ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर २०१९ दरम्यान हे निवड शिबिर होणार आहे. त्यातून भारतीय पुरुष व महिला संघ निवडला जाईल. सदर […]

loading